Solapur : विधिमंडळातील त..त..फ फडणवीसामुळे बंद झाले.आ.आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : विधिमंडळातील त..त..फ फडणवीसामुळे बंद झाले.आ.आवताडे

मंगळवेढा : भाजपचा 106 वा आमदार होताना मी विधानसभेत नवखा होतो, काय बोलायचं ! कसं बोलायचं ! किती वेळ बोलायचं ! याची माहिती नव्हती त्यामुळे पहिल्याच अधिवेशनात बोलताना माझे त ..फ..फ झाले.परंतु तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही उभा राहून प्रश्न क्रमांक तेवढा वाचा बाकीच मी उचलून धरतो असा शब्द दिल्यामुळे तालुक्यातील प्रश्न मांडण्याचे धाडस वाढल्याचे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.

आवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रा.लि. च्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते प्रास्ताविकात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की, माझ्यासारख्या नवख्या आमदाराला ताकद देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे आम्ही मतदारसंघातील प्रश्न आता प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.

पोटनिवडणुकीत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रशांत परिचारक यांचे आभार मानत पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान नंदूर चा कारखाना बंद असल्याचे समजतात त्यांनी या भागातील तरुणांना रोजगार पुन्हा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले परंतु साखर कारखानदारीत उतरायची इच्छा नव्हती त्यांच्या मदतीने या कारखान्याचा बॉयलर पेटण्यास महत्त्वपूर्ण योगदान ठरले. दोन तालुक्याच्या मतदारसंघात तीन महिन्यात 600 कोटीचा निधी दिला असून पाणी हे लागलेली आग विझवण्यास कारणीभूत ठरते मात्र मंगळवेढ्याचे राजकारण पेटवण्याचे कारण पाणी ठरले.

24 गावाच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करीत आहेत या योजनेत असलेल्या त्रुटीची पूर्तता नुकतीच केली असून जवळपास 718 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्रीच तगादा लावत आहे.

बसवेश्वर व चोखोबा स्मारक,भिमा नदीच्या पात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे,गादेगाव व निंबोणी ग्रामीण रूग्णालय,ग्रामीण रूग्णालयाचे सामान्य रूग्णालयात वर्ग,अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्वच मंडल मधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,पौट साठवण तलावाचा प्रश्न सोडवल्यास लगतच्या 16 गावातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे,माण नदीला कालव्याचा दर्जा देण्याची मागणी करताना ऊसदराचा प्रश्न तसेच पंढरपूर परिसरातील प्रलंबित एमआयडीसी चा औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडवण्याची देखील मागणी केली.

याच परिपक्व बोलण्यातून प्रलंबित विकासकामाची मागणी केल्यानंतर या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आ.आवताडे यांनी केलेल्या कामाच्या मागण्याची नोंद घेतली असून मागणी केलेले सर्व प्रश्न मार्गी लावून भविष्यात कामाच्या भरोश्यावर पुन्हा मत मागण्यास जावू असा विश्वास दिला