
सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार
सोलापूर: राजकारणात अनेक लाटा येतील आणि जातील. पण, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी शहरातील तिन्ही विधानसभेत जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. सभासद नोंदणीच्या माध्यमातून शहर पिंजून काढणार असून आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या कामाच्या बळावर व नवीन युवा सदस्यांच्या सहभागाने महापालिकेवर तिरंगा फडकाविणार असल्याचा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
शहरातील शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि शहर मध्य या तिन्ही विधानसभा मतदारसंघात डिजिटल सभासद नोंदणी अधिकाधिक व्हावी, असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले. दरम्यान, डिजिटल सभासद नोंदणीसंदर्भात आयोजित बैठकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला. यावेळी सर्वाधिक सभासद नोंदणी केल्याबद्दल नगरसेविका फिरदोस पटेल, सुशील बंदपट्टे, सागर शहा, कुणाल गायकवाड यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, गटनेते चेतन भाऊ नरोटे, नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, तौफीक हत्तुरे, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, प्रदेश चिटणीस ॲड. मनीष गडदे, प्रा. नरसिंह आसादे, किसन मेकाले, अरुण साठे, देविदास गायकवाड, उदय चाकोते, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तीकोंडा, योगेश मार्गम, विवेक कन्ना, हारून शेख, मधुकर आठवले, शौकत पठाण आदी उपस्थित होते.
Web Title: Solapur Mla Shinde Congress Flag Over
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..