

High-Voltage Drama in Mohol Municipal Council Elections
Sakal
मोहोळ : "हायव्होल्टेज" नगरपरिषद म्हणून परिचित असलेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवार ता 16 रोजी होणार असून, त्याच दिवशी स्वीकृत नगरसेवक ही निवडले जाणार आहेत. दरम्यान उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चिंता नूतन नगरसेवकांना लागली आहे. दरम्यान प्रत्येकाला एक एक वर्षाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र प्रथम उपनगराध्यक्ष पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी इच्छुकांची नेते मंडळीकडे मोठी पायपीट सुरू आहे.