सलगर बुद्रुक (सोलापूर) : वादळी वारे, पाऊस व गारपिटीने नुकसान (Solapur Rain Damage) झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करा व त्याचा रिपोर्ट शासनाला कळवा, जनतेची कामे करण्यात आपली हुशारी दाखवा. जनतेला त्रास देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करू नका नाहीतर तुमची खैर केली जाणार नाही. जनतेची कामे न करता उलट सर्वसामान्यांना अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केल्याशिवाय स्वस्त बसताना नाही, अशा कडक शब्दांत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.