
सोलापूर : नोटरी पद्धतीने घेतलेल्या जागेची कर आकारणीसाठी नोंद लावण्यासाठी महापालिकेच्या कर विभागातील लिपिक चंद्रकांत दोंतूल याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये मागितले. त्यातील २८ हजार ७४५ रुपये न भरता स्वत:कडेच लाच स्वरूपात ठेवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोंतूल याच्यावर कारवाई केली आहे. त्याला ताब्यात घेऊन सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.