सोलापूर : भव्य तिरंगा उभारणीत महापालिकेची उदासीनता

मंत्रालयाची अनुकूलता असतानाही अडीच महिने उलटले तरी पाठवला नाही प्रस्ताव
सोलापूर महापालिका
सोलापूर महापालिकाsakal

सोलापूर : सर्व देश पारतंत्र्यात असताना १९३० मध्येच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या ऐतिहासिक हुतात्मा नगरीत भव्य राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना प्रियदर्शनी फाउंडेशनने मांडली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सर्वांनी त्याला अनुकूलता दाखवली असताना, अडीच महिने उलटले तरी अद्यापही प्रस्ताव पाठविण्यात महापालिका उदासीन आहे.

देशातील अनेक ऐतिहासिक शहरांतील पर्यटनस्थळांवर भव्य राष्ट्रध्वज उभारलेला आहे. याच धर्तीवर सोलापूर शहरातही भव्य तिरंगा ध्वज उभारल्यास एका नव्या पर्यटनस्थळाची भर पडेल, या उद्देशाने २० जानेवारी रोजी प्रियदर्शनी फाउंडेशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदन देऊन सोलापूर शहरात भव्य राष्ट्रध्वज फडकावण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीला सर्व मंत्र्यांनी अनुकूलता दाखवत स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रस्ताव आल्यास निधीची तरतूद केली जाईल, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे पर्यटन मंत्रलयाकडून १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेला याबद्दल प्रस्ताव पाठविण्याबाबतचे पत्र आलेले आहे. या संदर्भात प्रियदर्शनी फाउंडेशनने वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने अद्याप प्रस्ताव पाठवलेला नाही. ऐतिहासिक हुतात्मा नगरीच्या वैभवात भर टाकणारा प्रकल्प महापालिकेच्या उदासीनतेमुळे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३६५ दिवस फडकावता येतो राष्ट्रध्वज

पूर्वी केवळ राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने व शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवता येत असे. मात्र, या नियमात बदल

करण्यात आलेला आहे. राष्ट्रध्वजावर प्रकाशाची व्यवस्था असल्यास ३६५ दिवस राष्ट्रध्वज फडकावता येतो. तसेच राष्ट्रीय सणाच्या दिवशी आता खासगी संस्थांची कार्यालये तसेच निवासस्थाने येथे देखील राष्ट्रध्वज फडकावता येतो.

भव्य राष्ट्रध्वज उभारणीसाठी मंत्रालयातून अनुकूलता दाखवण्यात आली आहे. मात्र महापालिका याबाबत उदासीन आहे. सोलापूर ही हुतात्मा नगरी आहे. यासाठी शहरात भव्य राष्ट्रध्वज उभारावा म्हणून प्रियदर्शनी फाउंडेशनच्या वतीने २० जानेवारी रोजी मागणी केली आहे.

- प्रा. राहुल बोळकोटे,अध्यक्ष, प्रियदर्शनी फाउंडेशन, सोलापूर

या भव्य राष्ट्रध्वजामुळे शहराच्या वैभवात भर पडेल. तसेच पर्यटक भेटीतून महापालिकेला उत्पन्न देखील मिळू शकते. महापालिकेने याबाबतचा प्रस्ताव त्वरित पाठवावा.

- सुनील व्हटकर,उपाध्यक्ष, शहर काँग्रेस

राज्यातील अनेक ऐतिहासिक शहरांत असा राष्ट्रध्वज आहे. आपल्या सोलापूर शहरातही असा राष्ट्रध्वज उभारल्यास हुतात्मा नगरीचे महत्त्व निश्चितच वाढेल. येत्या १५ ऑगस्टपर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.

- नागेश बिडवे, माजी तालुकाप्रमुख, बार्शी तालुका शिक्षकेतर संघटना

देखभाल व निगा राखण्याचाच विषय असेल आणि महापालिकेने असमर्थता दाखवली तर सेवाभावी संस्था पुढे येतील. मात्र सातत्य आणि जबाबदारी यासाठी देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थेकडेच असणे हितावह आहे.

- सूर्यकांत शिवशरण, खजिनदार, प्रियदर्शनी फाउंडेशन, सोलापूर

हा विषय राष्ट्रध्वजाचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा आहे. याबद्दलची नियमावली काय आहे, हे पाहूनच यावर निर्णय घेतला जाईल.

- संदीप कारंजे,नगर अभियंता, महापालिका

या पाच ठिकाणांचा दिला पर्याय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भुइकोट किल्ला परिसर सिद्धेश्वर मंदिर परिसर होम मैदान

सात रस्ता परिसर या ठिकाणी फडकतोय भव्य तिरंगा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई कोथरूड, पुणे विमानतळ, हुबळी

बेळगाव ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com