अश्विनी,यशोधरा व मार्कंडेय रुग्णालयाची जागा ताब्यात घ्या

अश्विनी,यशोधरा व मार्कंडेय रुग्णालयाची जागा ताब्यात घ्या

सोलापूर - शहरातील अश्विनी, यशोधरा आणि मार्कंडेय रुग्णालयास शासन व महापालिकेच्या जागा काही अटींवर देण्यात आल्या आहेत. मात्र या तीन्ही रुग्णालयांकडून या अटींचा भंग होत असल्याने महापालिकेने तातडीने या तिन्ही रुग्णालयाच्या जागा ताब्यात घ्याव्यात, असा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखल झाला आहे. 

या तिन्ही रुग्णालयांत गरीबांना मोफत किंवा अल्पदरात उपचार करण्याच्या अटीवर जागा देण्यात आली आहे. मात्र सध्या कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी संबंधितांकडून 50 हजार ते 1 लाख रुपये बिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे जागा देताना केलेल्या अटी व कराराचा भंग झाला आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. शिवसेनेचे राजकुमार हंचाटे  व अनिता मगर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

करामध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव
शहरातील व्यावसायिक संकुले शासनाच्या आदेशानुसार तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा विचार करता या व्यावसायिक इमारतींना तीन महिन्यांच्या करामध्ये सवलत द्यावी, असाही प्रस्ताव श्री. हंचाटे व सौ. मगर यांनी दिला आहे. शुक्रवारी (ता.19) होणाऱ्या सभेत या प्रस्तावाबाबत चर्चा अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com