... आणि त्यांचा बीपी नॅार्मल झाला आणि आई-वडीलही ठणठणीत 

... आणि त्यांचा बीपी नॅार्मल झाला आणि आई-वडीलही ठणठणीत 
Updated on


सोलापूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

सर्व्हेक्षणाचे काम ज्यांना देण्यात आले आहे त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांचा बीपी अचानक हाय झाला, पत्नी बेडरेस्टवर गेली तर काहीजणांना घरातील वृद्ध आई-वडीलांची काळजी वाटू लागली. ही कारणे देत घरी बसण्याच्या अर्जाचा ढीग खातेप्रमुखांकडे जमू लागला. काम चुकविण्यासाठी सुरु असलेल्या या प्रकाराबाबत आयुक्तांनी गांभीर्याने घेत अशा कर्मचाऱ्यांसाठी शिस्तभंगाची जालीम लस दिली. त्यामुळे अर्ज दिलेल्यांचा बीपी अचानक व्यवस्थित झाला, पत्नी नॅार्मल झाली तर वृद्ध आईवडीलही ठणणठीत झाले. 

सर्व्हेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी हे शासकीय नियमानुसार कार्यालयीन वेळेत कार्यालयात एका टेबलवर बसून काम करणारे आहेत. त्यामुळे फिल्डवर घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठी नियुक्ती झाल्यावर अनेकांनी त्याचा धसका घेतला. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधित परिसरात सर्व्हे करायचा असल्याने त्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. मग या झंझाटातून सुटका करून घ्यायची असेल तर काहीतरी युक्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठरवले आणि
न पटणाऱ्या कारणांसह रजेवर जाण्याचे अर्ज खातेप्रमुखांकडे दिले गेले.

सार्वत्रिक निवडणुका आल्या की अशी कारणे सांगून कर्तव्यापासून लांब जाण्याचे प्रकार प्रत्येक वेळी होतात. अनेकजण वशिल्याने आपली नियुक्ती रद्द करून घेतात. मात्र आता निवडणुकीतील नियुक्तांवर केंद्रीय स्तरावरून नियंत्रण होऊ लागल्याने नियुक्ती रद्द करण्याचे धाडस सहसा कोणता अधिकारी करत नाही. आता जागतिक संकट आले असताना कर्तव्यापासून दूर पळण्याचे हे प्रकार सुरु झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

लॅाकडाऊनपूर्वी सर्वदृष्टीने नॅार्मल असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना शारीरीक अडचणी जाणवू लागल्या आणि त्याची संख्या वाढल्याने महापालिकेतील वरिष्ठांना संशय आला आणि त्यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणू दिली. त्यांनीही या प्रकरणातील गांभीर्य अोळखून अशा कर्मचार्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस काढली. त्याचा परिणाम झाला आणि रजेचे अर्ज देणारे सर्व कर्मचारी हजर झाले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Vidhan Parishad election results BJP victory
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Shocking Murder in Mohol: Woman and Two Sons Accused in Uncle’s Killing
tet exam
Marathi News Esakal
www.esakal.com