
-प्रमिला चोरगी
सोलापूर : महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात शहरातील खासगी व शासकीय अशा विविध जागांवर ९२१ आरक्षणे आहेत. त्यापैकी ६२५ जागा या खासगी आहेत. १९९७ च्या आराखड्यात ज्या ६२५ जागांवर आरक्षण होती त्याच जागांवर नव्या आराखड्यातही आरक्षणाच्या प्रकारात बदल करून आरक्षणे कायम ठेवली आहेत. त्यामुळे एकूण ४७ वर्षे या जागांवर आरक्षण कायम राहणार आहे.