
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही जिल्ह्यातील नगरपंचायतींमध्ये ती जादू दिसली नाही. तिन्ही पक्ष एकमेकांविरुध्द लढल्याचे पहायला मिळाले.
Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच
सोलापूर - जिल्ह्यातील वैराग, माढा, नातेपुते, माळशिरस व श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये वैराग, श्रीपूर महाळूंग नगरपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर माढ्यात कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. माळशिरस नगरपंचायतीत मोहिते-पाटील समर्थकांनी बाजी मारली. त्याठिकाणी भाजपला यश मिळाले. नातेपुते नगरपंचायतीत मोहिते-पाटील समर्थक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी वर्चस्व मिळविले. पाचही नगरपंचायतीत शिवसेनेला सत्ता मिळविता आला नाही.
वैराग, माढा, नातेपुते, माळशिरस व श्रीपूर-महाळूंग या नगरपंचायतींचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा चेहरा त्याठिकाणी चालला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही या नगरपंचायतींमध्ये ती दिसली नाही. तिन्ही पक्ष एकमेकांविरुध्द लढल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा: नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव; महाआघाडीचा 'विकास'
माळशिरस नगरपंचायतीत भाजपला 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीने दोन, महाविकास आघाडी पॅनलने दोन, अपक्षांनी तीन जागा काबिज केल्या. त्याठिकाणी भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. नातेपुते नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाले होते, त्याठिकाणी मोहिते-पाटील समर्थक बाबाराजे देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली.
वैराग या नवीन नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांचे वर्चस्व कायम राहिले. महाळूंग-श्रीपूर या नव्या नगरपंचायतीतही राष्ट्रवादीने सहा, कॉंग्रेस व भाजप प्रत्येकी एक आणि स्थानिक आघाडीचे भिमराव रेडे-पाटील यांच्या गटाला पाच तर नानासाहेब मुंडफने यांच्या गटाला चार जागा मिळाल्या. आता त्याठिकाणी स्थानिक आघाडीच्या नेत्यांवर सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे.
माढा नगरपंचायतीत सत्ताधारी गटाने 12 जागा मिळविल्या. कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन, शिवसेनेसह अपक्षांना तीन जागा मिळाल्या. प्रभाग एकमध्ये अजिनाथ राऊत व त्यांची पत्नी सुनिता राऊत यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे पाचही नगरपंचायतीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही.
हेही वाचा: सत्तारांचा दानवेंना 'दे धक्का', सोयगावात शिवसेनेचा भगवा
जिल्हाप्रमुखांची तातडीची बैठक
जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्याचे मुख्यमंत्रीपद पक्षप्रमुखांकडे असतानाही यश न मिळाल्याने पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचे समजते.
Web Title: Solapur Nagar Panchayat Election Result Shivsena Lost Ncp Bjp Won
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..