Solapur : राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर

पुरस्काराचे वितरण शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे.
Solapur news
Solapur newsesakal

सोलापूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी १७ गुणवंत शिक्षकांची निवड झाल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी दिली.

Solapur news
Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे. यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच संघटनेचे सुनील चव्हाण, अप्पासाहेब पाटील, गुरुनाथ वांगीकर, सोमेश्वर याबाजी, भिमराया कापसे, अ.गफुर अरब यांचीही उपस्थिती असणार आहे. स्मृतीचिन्ह, शाल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराच स्वरूप आहे. या कार्यक्रमास शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अनिल गायकवाड, संतोष माशाळे, दिपक डांगे, शाम कदम, विशाल काळे, प्रकाश बाळगे, समीर शेख, विशाल पवार, सिद्धेश्वर पवार, अजित कणसे, हणमंत भोसले, नितीन भांगे, धन्यकुमार स्वामी यांनी केले आहे.

‘हे’ आहेत पुरस्काराचे मानकरी

युवराज चव्हाण (शिवशंकर थोबडे प्रशाला), राजेंद्र आसबे (साधना विद्यालय, तावशी), मेघराज हुनचे (कै. रा.थोबडे प्राथमिक शाळा), पुष्पा शिंदे (राघवेंद्र स्वामी विद्यामंदिर), निता केवटे (जि.प.प्राथमिक शाळा, कंदलगाव), विजय शेंडे (महावीर जैन विद्यालय, अकलुज), सुवर्णा कुलकर्णी (नु.म.वि. मंगळवेढा), रविंद्र देशमुख (जि.प. प्रा.शाळा, खवसपूर), राजश्री चेचे (साईबाबा विद्यामंदिर, दहिटणे), सरस्वती मोटे (अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी), शिवा जाधव (नु.म.वि.प्राथ शाळा, सोलापूर), अजिनाथ कोळी (जि.प. प्रा.शाळा तुपेवस्ती, मेडद), जावेद चांदा (सिटीझन हायस्कुल), खलीलुर पेरमपल्ली (पानगल हायस्कुल), तहसीन शेख (बेगम कमरुन्नीसा हायस्कुल), सुवर्णा झाडबुके (हत्तुरे प्राथमिक शाळा), जनार्दन वाघमारे (आदर्श प्राथमिक शाळा), मोतीलाल निंबाळकर (ह.भ.प. अणप्पा महाराज प्राथमिक शाळा) यांच्यासह उपक्रमशील शाळा म्हणून नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपरिषद सेंट्रल स्कूल मुले-१, करमाळा व श्री चतुरबाई श्राविका विद्यालय प्राथमिक शाळेचा गौरव होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com