
माळीनगर : साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ साखर कारखाने एक डिसेंबरअखेर चालू झाले आहेत. त्यामध्ये १० लाख ३५ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ७.०९ टक्के सरासरी साखर उताऱ्याने सात लाख ३४ हजार ९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.