Solapur News : दासरे कुटुंबातील बापलेकांनी केली सुगंधी तेल उत्पादन प्लांट निर्मिती

वेल्डिंगचे कौशल्य असल्याने या बापलेकांनी मिळून फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरु केले.
dasre family
dasre familysakal

सोलापूर - शेतीसोबत तांत्रिक कौशल्याची आवड जपणाऱ्या दासरे कुटुंबातील बापलेकांनी चक्क जिरॅनियम सुगंधी तेल निर्मिती प्रकल्पाची निर्मिती करत छत्तीसगड, ओरिसासह अनेक राज्यात स्वतःची वेगळी ओळख बनविली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील गुरुसिद्धप्पा दासरे यांना शेतीसोबत तांत्रिक कौशल्याचे प्रयोग करण्याची आवड आहे. त्यांनी ‘किल्लीक निक्सन’ या ब्रिटीश कंपनीत केलेल्या कामाच्या शिदोरीवर घरी अनेक तांत्रिक प्रयोग करत काही उपकरणे तयार केली. नंतर त्यांनी स्वतःच्या शेतात जिरॅनियम गवताची लागवड करून तेल निर्मितीचा प्रकल्प स्वतःच तयार केला होता. हा प्रकल्प त्यांनी वापरल्यानंतर त्यांनी गावाकडची शेती विकून ते त्यांचा मुलगा सचिन व सुशीलकुमार यांच्या समवेत सोलापुरात आले.

वेल्डिंगचे कौशल्य असल्याने या बापलेकांनी मिळून फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरु केले. या वर्कशॉपमध्येदेखील पुन्हा जिरॅनियम तेल निर्मितीचा प्रकल्प अधिक क्षमतेचा कसा करता येईल, याचे प्रयोग दासरे कुटुंबीयांनी सुरु केले. त्यासोबत जमीन भाड्याने घेऊन त्यांनी पुन्हा जिरॅनियम लागवड करत सुगंधी तेल निर्मिती व विक्री सुरु केली. पण प्रकल्पाची क्षमता वाढवून हे प्रकल्प विक्री योग्य कसे करता येईल, यासाठी दासरे कुटुंबीयांची धडपड सुरु होती.

dasre family
Solapur News : महापालिकेतर्फे ११५० जणांना जप्तीच्या नोटीसा

सुरवातीला सचिन दासरे यांचे नातेवाईक अमित ढोले यांना त्यांनी जिरॅनियमची शेती व प्रकल्पाबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रकल्प खरेदी करण्याचे ठर.विले पहिला प्रकल्प विक्रीची सुरवात झाली. त्यानंतर कोरोना काळात यूट्यूबवर जिरॅनियमची सुगंधी तेल निर्मितीचा मोठा प्रचार झाला होता. जिरॅनियम गवताची कापणी केल्यानंतर केवळ चारच तासात प्रक्रिया केली तरच सुगंधी तेलाचे सर्वाधिक उत्पादन मिळते त्यामुळे स्वतःचा प्रकल्प असणे ही उत्पादकांची गरज बनली.

जादा क्षमतेच्या प्रकल्प मागणी वाढली. मागणीनुसार ५०० किलो ते १.५ टन क्षमतेचे प्‍लांट तयार होऊ लागले. त्यासोबत त्यांच्या प्रकल्प निर्मितीचा प्रचार देखील सर्वदूर होऊ लागला. त्यांच्या प्रकल्प विक्री महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश व ओरिसा राज्यापर्यंत होऊ लागली.

dasre family
Solapur : दिल्लीतील भाजपाची अदृष्य शक्ती मराठी माणसाला त्रास देण्याचे काम करीत आहे- सुप्रिया सुळे

ठळक बाबी

वडील व दोन मुलांनी उभारला व्यवसाय

तांत्रिक कौशल्याच्या आवडीतून उत्पादन निर्मिती

स्वतः प्रयोग करुन मग ग्राहकांना दिली उत्पादन सेवा

उद्योगातून १५ जणांना थेट रोजगार

सहाजणांना अप्रत्यक्ष रोजगार

dasre family
Solapur : पोटचा गोळा गेल्याचं डोंगराएवढं दु:ख आवरून मुलाचे नेत्रदान

स्टार्टअपमधून विकसित

केलेली मूल्ये...

स्वतःच्या तांत्रिक कौशल्यातूनच उत्पादन निर्मिती

मागणीनुसार उत्पादनाचा पुरवठा

विविध राज्यातून उत्पादनाची मागणी

वडीलांच्या तांत्रिक कौशल्यातून उत्पादनाचा मुलांकडून विकास

dasre family
Solapur News : पावणे दोनशे कोटीच्या कर थकबाकीसाठी ११५० जणांना जप्ती नोटीस

जिरॅनियम तेलाची निर्मितीमधून शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्न सहज मिळू शकते. त्यासाठी आता शेतकरी स्वतःचे तेल निर्मितीचे प्लांट उभारत आहे. हे प्लांट रास्त किमतीत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो.

- सचिन दासरे, संचालक, सुशील इंजिनिअरींग वर्क्स, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com