Solapur News : आईला स्वत:च्या पोटचा गोळाच विकायचा होता पण...

पैशाच्या मोहातून बाळाचे अपहरण; पोलिस तपासात मातृत्वाच्या गुंतागुंतीचा उलगडा
Baby-and-Mother
Baby-and-Mothersakal

सोलापूर - अपहरण प्रकरणातील ‘त्या’ आरोपी महिलेस तिला स्वतःचेच बाळ पैशासाठी विकायचे होते. पण स्वत:च्या बाळाला सर्पदंश झाल्याने ते विकण्यात अडचण आली. अशातच सर्पदंशाने आजारी पडलेल्या स्वतःच्या बाळाच्या उपचारासाठी ती धडपडत राहिली. उपचार व घर खर्चासाठी पैशाचा मेळ लागेना.

तेव्हा पैशासाठी तिने मग बाळाचे अपहरण करुन ते विकले.पोलिस तपासात मातृत्वाच्या गुंतागुंतीचा उलगडा अखेर झाला.

मीरा गोटीवाले या लोधी गल्लीतील रहिवासी आहेत. ३ मे २०२३ ला सामूहिक विवाह सोहळ्यात अचानक मिरा गोटीवाले यांचा अकरा महिन्याचा मुलगा गायब झाला.

Baby-and-Mother
Ahmednagar : ‘सीना’त पाणी येऊनही शेतकरी वंचित राहणार

लग्न सोहळ्यात व नंतर नातेवाइकाकडे विचारणा केली पण बाळ सापडेना. त्यावेळी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर बझार पोलिस ठाण्याचे एपीआय दिनेश कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन माळी यांच्या पथकाने शोध सुरु केला.

पोलिसांनी व्हॉटसअपवर संपर्क क्रमांक व बाळाच्या छायाचित्राच्या पोस्ट तयार करुन त्या व्हायरल करण्यास सुरवात केली. बाळाची आई मीरा गोटीवाले यांनी त्यांच्या मोबाईलवर स्टेट्‌स ठेवले होते.

Baby-and-Mother
Jalna News : अचानक गारांसारखा दगडांचा वर्षाव झाला,जालन्यातील जखमी पोलिसांच्या प्रतिक्रिया

मीरा गोटीवाले यांची एक नातेवाईक महिला विडी घरकुल भागात राहते. त्यांच्याकडे घरोघरी जाऊन विडी कामाची नोंद घेण्याचे काम होते. त्यांनी मोबाईलवरील स्टेटस पाहिल्यानंतर हे बाळ तिने आरोपी लता येलगम हिच्याकडे असल्याचे स्टेटसवरील फोटोवरून तिच्या लक्षात आले.

दरम्यान, त्यांनी लता येलगमकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी हे बाळ दत्तक घेतल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी हा प्रकार मीरा गोटीवाले यांना सांगितला. तपास करणाऱ्या पोलिसांना हा सुगावा लागताच त्यांनी तत्काळ बाळास ताब्यात घेऊन तब्बल पाच महिन्यांनी त्याच्या आई मिरा गोटीवाले यांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर हा प्रकार कसा घडला? याचा उलगडा पुढील तपासात समोर आला.

Baby-and-Mother
Benefits Of vitamin D: फक्त कॅल्शियमच नाही तर मजबूत हाडांसाठी हे व्हिटॅमिन्सही आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या

लता चंद्रभानू येलगम या महिलेने बाळ दत्तक घेण्याचा प्रयत्न चालविला होता. लक्ष्मी सामलेटीच्या माध्यमातून तिने वंदना मनसावाले हिचे बाळ घेण्याचे ठरविले होते. वंदना मनसावाले ही गर्भवती असताना त्यांचे बाळ जन्माला आल्यानंतर घेण्याचा सौदा ठरला. त्यानंतर वंदना मनसावाले हिस अपत्य झाल्यानंतर या अपत्याला सर्पदंश झाल्याने त्याचेवर उपचार सुरु होते.

त्यामुळे वंदना मनसावाले हिने स्वतःच्या बाळाचा उपचाराचा खर्च भागवण्यासाठी बाळ चोरून आणून देण्याचा प्रकार झाल्याचे तपासात सांगितले. पैशाच्या मोहातून बाळाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या गुन्ह्यात पोलिसांकडून आरोपी वंदना मनसावाले (वय २७, रा.विडी घरकूल), लक्ष्मी सामलेटी (वय ५८, विडी घरकूल), लता चंद्रभानू येलगम (वय ३८, विडी घरकूल) व चंद्रभानू येलगम (रा. विडी घरकूल) यांना अटक करण्यात आली.

असा घटनाक्रम...

गर्भवती असताना आरोपीकडून स्वतःचेच बाळ विकण्याचा ठरला होता सौदा

प्रसूतीनंतर नवजात बालकास सर्पदंश झाल्याने सौदा मोडण्याची वेळ

बाळाच्या उपचाराच्या खर्चाची अडचण

खर्च भागवण्यासाठी रकमेच्या आशेने मीना गोटीवाले यांच्या बाळाचे अपहरण

अपह्रत बाळ लता येलगमकडे केले होते सुपूर्द

सोशल मीडियावर पोलिसांकडून बाळाचे फोटो व्हायरल

घरोघरी विडी कामाचा हिशेब घेणाऱ्या महिलेकडून लता येलगमकडे बाळाचा लागला शोध

महिलेकडून दिलेल्या मोबाईल नंबरवर बाळ असल्याचा प्रतिसाद

पोलिसांकडून बाळ आईच्या ताब्यात

चार आरोपींना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com