Solapur News : शेतावरील ,कॅनालवरील विद्युत पंप चोरणा-या आरोपीस मुद्देमालासह पोलिसांनी केली अटक

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतक-यांच्या १७ पाण्याच्या मोटारी (अंदाजे किंमत ३,३३०००)चोरी केल्या असुन
solapur news
solapur news sakal

राजेश कणसे

आळेफाटा- याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर)गावच्या हद्दीतील कैचान मळा व डावखर मळा या ठिकाणी रहात असलेले राजेंद्र सखाराम कु-हाडे, वसीम मनीयार,गणपत कु-हाडे,विशाल हाडवळे, संदीप बबन डावखर या शेतक-यांच्या पाण्याच्या मोटारी पिंपळगाव जोगे धरण्याच्या डाव्या कालव्यावरून अज्ञात चोरट्यांणी चोरून नेल्या होत्या.

याबाबतची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिल्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांणी तपास सुरू केल्यानंतर पोलासांणा गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग करत असताना ऋषिकेश बाळासाहेब भंडलकर रा.आळे डावखर वस्ती ता.जुन्नर जि.पुणे हा विद्युत पंप चोरून विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर

solapur news
Solapur News : अखेर नीरा उजवा कालव्याच्या मैल ९३ ला सोडले पाणी

त्यास संशयीत आरोपी म्हणुन ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पोलिसांणी कसुन तपास केला असता त्याने आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतक-यांच्या १७ पाण्याच्या मोटारी (अंदाजे किंमत ३,३३०००)चोरी केल्या असुन त्याने हे विद्युत पंप शहजाद अली भग्गन इद्रिसी यास विकल्या आहेत असे सांगितले.पोलीसांणी आरोपी कडुन एम.एच.१४ डी.एस.९४३६ हिरो होंडा मोटार सायकल व मोटारी जप्त करुन विद्युत पंप चोरी करणारा व त्या खरेदी करणा-या या दोघांस पोलिसांणी अटक केली आहे.

solapur news
Solapur News : खाकी’ वर्दीकडूनच मटका ‘ओपन’; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर,सहाय्यक फौजदार चंद्रशेखर डुंबरे,सथशतईश टाव्हरे,विनोद गायकवाड,लहानु बांगर,भिमा लोंढे,विकास गोसावी,नरेंद्र गायकवाड,संजय शिंगाडे,संतोष दुपारगुडे,अमित पोळ,अमित माळुंजे,हनुमंत ठोबळे,नविन अरगडे,आमले यांणी केली आहे.

solapur news
Solapur News : वातावरण खराब आहे, गणेशोत्सवात जागरूक राहा; पताका, कमानी, झेंडे लावण्यासाठी परवानगी बंधनकारक - पोलिस आयुक्त

दरम्यान आळेफाटा पोलीसांणी विद्युत मोटारी चोरी संर्दभाची केलेले चोरीची कारवाई ही जिल्हयातील सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांणी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com