Solpaur Newas : ड्रेनेज सफाईसाठी आता स्वच्छता शीघ्रकृती दल

सेफ्टी टॅंकमध्ये उतरताना मिळणार सुविधा; दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पाऊल
solapur news
solapur newssakal
Updated on

सोलापूर - भूमिगत मलनि:सारण यंत्रणेची अथवा सेफ्टी टॅंकची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारास मॅनहोल किंवा नाल्यात उरून साफ करावे लागते. अशावेळी आवश्यक ती काळजी न घेतल्याने अपघाताच्या किंवा कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडतात.

ते टाळण्यासाठी त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून आता महापालिकेत स्वच्छता शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर महापालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. त्याअनुषंगाने रोहन लोंढे, जावेद सय्यद व नितीन गायकवाड हे संगणक चालक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

solapur news
Pune News : कीर्तनातून प्रबोधन,भजनी मंडळांचाही समावेश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने स्वच्छता कामगारांच्या जीवाची काळजी घ्यायची आहे. त्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे. स्वच्छता शीघ्रकती दल (इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटायझेशन युनिट) स्थापन करून त्याचा दैनंदिन अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे. गिरीश तंबाके हे सिस्टिम समन्वयक असणार आहेत.

solapur news
Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

हा कक्ष सकाळी सहा ते दुपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा आणि त्यानंतर रात्री दहा ते सकाळी सहा, अशा तीन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. दरम्यान, प्राप्त तक्रारीसाठी किंवा नागरिकांच्या मागणीप्रमाणे काम करणाऱ्या महापालिकेच्या संबंधित वाहनावर ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे नियंत्रण तसेच महापालिकेकडून नेमलेल्या भूमिगत मलनि:स्सारण यंत्रणेची साफसफाईची व सेफ्टी टॅंकची वेळापत्रकानुसार नियंत्रण ठेवले जाणार आहे.

नागरिकांना १४४२०वर नोंदविता येणार तक्रारी

सोलापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातील ड्रेनेज दुरुस्ती किंवा स्वच्छतेची तक्रार १४४२० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. त्याठिकाणी आलेली तक्रार ड्यूटी पर्यवेक्षकांना किंवा महापालिकेच्या अधिकृत व्हाट्‌सॲपवर कळविली जाणार आहे. त्या तक्रारीचे रेकॉर्ड ठेवले जाईल.

solapur news
Mumbai Ganpati Festival : बाप्पाच्या आगमनासाठी सजली मुंबई ; रस्त्यांवर गर्दीच गर्दी

ड्यूटी पर्यवेक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार पॅरामेडिक्स, रुग्णवाहिका, पोलिस व एसईपी सदस्यांना ती तक्रार कळविली जाणार आहे. सेफ्टी टॅंकच्या स्वच्छेसंदर्भात कॉल आल्यानंतर सफाई अधीक्षक वाहन, घनकचरा व्यवस्थापन विभागास कळवावे.

कोणताही कर्मचारी पीपीई कीट न वापरता स्वच्छता करणार नाही, पूर्वपरवानगीशिवाय त्यात कोणीही उतरणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. कोणत्या परिसरातील सेफ्टी टॅंक किंवा ड्रेनेज दुरुस्ती केली, त्याची नोंद ठेवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com