Solapur News : हत्ती दरवाज्यातून येण्या-जाण्याचा पर्यटकांना मिळणार आनंद

भुईकोट किल्ल्यात आता सावरकर मैदानाकडूनही मिळणार प्रवेश; नागबावडी विहिरीचा होतोय कायापालट
elephanta door
elephanta door sakal

सोलापूर - भुईकोट किल्ल्यातील हत्ती दरवाजाच्या पुर्नबांधणीनंतर दुरुस्ती पर्व वेगात सुरू असून किल्ल्याच्या खंदकातील नागबावडी विहीर दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतली आहे. लवकरच सावरकर मैदानाकडील बाजूने हत्ती दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करण्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे.

बहामनी सरदार मुहमद गवान यांनी १४६० च्या आसपास भुईकोट किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याच्या आतील भागात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे. या मंदिराची पुष्करणी म्हणजेच नागबावडी विहीर होय. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस येथे हलविण्यात आल्यानंतर ही पुष्करणी किल्ल्याच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरली जाते. आजही या विहिरीच्या पाण्यावर किल्ल्याच्या २२ एकर जागेतील विविध झाडांना पाणीपुरवठा केला जातो.

मागील काही वर्षात या नागबावडीच्या भिंतीत झुडपे उगवल्याने पडझड झाली होती. या पाण्याचा अनेक दिवस उपसा न झाल्याने पाण्यावर शेवाळ जमा झाले होते. अंधश्रद्धेतून अनेक वस्तू येथे फेकल्या जात होत्या. कचरा, दलदल यामुळे दुर्लक्षित असलेल्या नागबावडी विहीरीकडे कुणाचेही लक्ष नव्हते. दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागाने सुरू केले आहे. किल्ल्याच्या हत्ती दरवाजाला पूर्व वैभव प्राप्त झाल्यानंतर आता नागबावडीला देखील पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.

elephanta door
Solapur News : अखेर नीरा उजवा कालव्याच्या मैल ९३ ला सोडले पाणी

दोन वर्षांपूवी झाली होती स्वच्छता

बारव स्वच्छता मोहिमेतर्गंत या नागबावडी विहीर परिसरात स्वच्छ करण्यात आला होता. तत्कालिन महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या पुढाकाराने एका सामाजिक संघटनने ही स्वच्छता मोहीम केली होती. त्यावेळी या परिसराची स्वच्छता करून दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. आता या नागबावडीची दुरुस्ती सुरु असल्याने परिसराचा कायापालट होत आहे.

elephanta door
Solapur News : अखेर नीरा उजवा कालव्याच्या मैल ९३ ला सोडले पाणी

महाद्वारामुळे वैभवात भर

या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा मोडकळीस आला होता.

या दरावाजाचे जुने लोखंडी साहित्य वापरून पुन्हा हुबेहुब पूर्वीप्रमाणे दरवाजा बसविण्यात आला आहे. २३ फुट उंचीचा हा हत्ती दरवाजा १२ फूट रुंद आहे. या दरवाजाला हत्तीने धडक दिली तरी दरवाजा तुटू नये म्हणून अनुकुचिदार खिळे बसविण्यात आलेले आहेत. या दरवाजामुळे किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे.

elephanta door
Solapur News : खाकी’ वर्दीकडूनच मटका ‘ओपन’; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सावरकर मैदानाकडील बाजुस आहे. सध्याच्या प्रवेश्वद्वाराकडून किल्ल्याचे वैभव पर्यटकाच्या नजरेस येत नव्हते. याकरीता आता हत्ती दरवाज्यातून प्रवेशाची सोय करण्यात येत आहे. याकरीता सावरकर मैदानाकडील बाजुनेदेखील एक तिकिट खिडकी सुरू करण्यात येत आहे.

महादेव कांबळे, क्षेत्र अधिकारी, पुरातत्व विभाग

elephanta door
Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुरवणी परीक्षा लांबणीवर, नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com