76 वर्षीय महिलेची 14 दिवसांची झुंज अपयशी ! सोलापुरात 19 नवे रुग्ण; महिलेचा मृत्यू 

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी- अधिक होऊ लागली आहे. आज शहरात 19 नव्या रुग्णांची भर पडली तर मुरारजी पेठेतील 76 वर्षीय महिला कोरोनाची बळी ठरली. 12 डिसेंबरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेने 14 दिवस कोरोनाशी झुंज दिली. मात्र, 26 डिसेंबर रोजी त्या महिलेचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी 'आरोग्य माझी जबाबदारी'अंतर्गत मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 37 हजार 218 हजार संशयितांची झाली टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 958 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 535 संशयितांमध्ये 14 पुरुष आणि पाच महिलांना झाली कोरोनाची बाधा 
  • मुरारजी पेठेतील 76 वर्षीय महिलेचा कोरोनाने घेतला बळी; मृतांची संख्या 590 झाली 
  • आतापर्यंत दहा हजार 83 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आता शहरात राहिले 285 रुग्ण 

शहरात आज शुक्रवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर, नवोदय नगर (मजरेवाडी), समर्थ नगर (जुळे सोलापूर), विकास नगर, कल्याण नगर, सुरवसे नगर, अंबिका नगर (कुमठा नाका), अवंती नगर (मुरारजी पेठ), सोलापूर कारागृह, गडगी नगर, सम्राट चौक, निखिल पार्क (आरटीओ कार्यालयाजवळ), विडी घरकूल, वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींचे वसतीगृह आणि माधव नगर येथे नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 91 संशयित होम क्‍वारंटाईन असून 10 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन आहेत. 20 संशयितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील 165 पुरुष आणि 120 महिला रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com