
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेतीन हजारावर गेलेला कांद्याचा सरासरी भाव आता तीन हजार रुपयांवर आला आहे. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ४२४ गाड्या कांदा आवक झाली होती. त्यातील पाच क्विंटल कांद्याला सहा हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तर ३२ क्विंटल कांद्याला अवघा ५०० रुपयांचा दर मिळाल्याचे पाहायला मिळाले.