
Solapur Padmashali Educational Institution: दीडशे वर्षांपूर्वी उदरनिर्वाहाच्या शोधात तेलंगणातून सोलापूर गाठलेल्या पद्मशाली बांधवांनी शिक्षण, उद्योगातून पूर्वभागात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुशल कामगारांच्या हाताला रोजगार देणारे उद्योजक आणि शिक्षण संस्कारातून समाजाची उन्नती साधणाऱ्या पद्मशाली बांधवांचा १५० वर्षांचा इतिहास सोलापूरला लाभला आहे.