Bhalke vs Autade: राष्ट्रवादी-भाजपच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली! निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात

परंतु या प्रत्यारोपात सर्वसामान नागरिकांचा प्रश्न मात्र बाजूला पडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Bhalke vs Autade
Bhalke vs Autadesakal

Bhalke vs Autade - विधानसभा निवडणुकीला जवळपास 15 महिन्याचा अवधी शिल्लक असतानाच संभाव्य उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. आणि आणि या पुढील काळात देखील होत राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत परंतु या आरोग्य प्रत्यारोपात सर्वसामान नागरिकांचा प्रश्न मात्र बाजूला पडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

2021 पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भातील 22 मागण्याची निवेदन घेऊन नुकताच प्रांत कार्यालयावर मोर्चा हलगी मोर्चा काढण्यात आला होता.

Bhalke vs Autade
Mumbai Murder : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून गर्लफ्रेंडच्या नवऱ्याची केली हत्या, पोत्यात भरून..

या मोर्चामध्ये त्यांनी प्रांत, तहसील, कृषी,पंचायत समिती, पोलीस स्टेशन, महावितरण, या शासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी बरोबर तालुक्यातील प्रमुख प्रश्न असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना बसवेश्वर चोखामेळा स्मारक छावणी चालकाची देयके शेतकऱ्याचा पिक विमा शहर विकास आराखडा आदी विषयावरून त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर सत्ताधारी आ समाधान आवताडे यांना टार्गेट केले.

Bhalke vs Autade
Mumbai Murder Case: क्रूरतेचा कळस! सरस्वतीचे शरीराचे 20 तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले अन्...

त्यावर त्यांनी अधिकाऱ्याच्या या गैरकृर्त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील केला तालुक्यातील प्रमुख पाणी प्रश्न मार्गी लागले नसताना जल्लोष केला, फुले उजळून घेतले पोस्टर लावण्याचा आरोप करत त्यांच्या इतर समर्थकानी पोलीस स्टेशन व नगरपालिका,तहसील वर भाषणातून आरोप केले.

या आरोपाला आ. समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेमधून प्रतिउत्तर देताना भगीरथ भालके यांनी काढलेला मोर्चा हा हलगी मोर्चा नसून तो पोटसुळ मोर्चा होता

असे सांगत स्व.भारत भालके यांनी सांभाळलेली माणसं सांभाळायचं सोडून त्यांच्यावर आरोप करत असल्याचे सांगून दोन वर्षे बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेविषयी कामाचा दर्जा, शिखर समिती आणि फक्त निवडणुकीपुरतं पाणी आलं व इतर विषयावर मी बोललो तर मोठा स्फोट होईल असेच सांगून कधीतरी उठून काहीतरी बोलून चालणार नाही.

Bhalke vs Autade
Mumbai Fraud : नफ्याचे आमिष दाखवत पतपेढी संचालकांनी 47 जणांना 17 लाख 36 हजाराला घातला गंडा

नगरपालिकेतील टक्केवारी जोरावर अनेकांनी आपले संसार चालवले मला मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडणार आहे. केवळ आपल्या बालहट्ट मुळे ही पाया मतदारसंघात पोटनिवडणूक लागले गेली. संचालक व कर्मचारी देखील माझ्या संपर्कात आहेत. सभासदांची साखर 10 किलोने कमी केली, साखरेचे दर 10 रू नी वाढवले.

मी सत्ता घेण्यापूर्वी 25 लाख रुपये बाहेर जात होते त्याचीच पुनरावृत्ती आता दिसून येत आहे. ते दोन वर्षे नॉट रिचेबल असल्यामुळे माझ्या कार्यालयात सकाळच्या सत्रात एक तास विरोधी गटाच्या कार्यकर्त्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. दरम्यान या आरोपाला देखील भगीरथ भालके यांनी प्रत्युत्तर दिले आहे एकूणात या आरोप्रत्यारोपात सर्वसामान्याचा प्रश्न बाजूला राहतो की काय ? अशी चर्चा सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com