
सिद्धराम पाटील
Solapur: चौदा वर्षे १० महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली. उद्या, सोमवार, ९ जून २०२५ रोजी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून पुन्हा एकदा प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होत आहे. वास्तवात सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय सेनादलाने मराठवाडा मुक्तिसंग्राम प्रसंगी हैदराबादच्या निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी होटगी रोड येथील विमानतळाची निर्मिती केली होती. त्यानंतर अडगळीत पडलेल्या या विमानतळाची पुनर्बांधणी तब्बल ३७ वर्षांनी, म्हणजे १९८४ मध्ये करण्यात आली.