solapur crime
solapur crimesakal

Solapur Crime : पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा कारवाईचा धडाका, मटका व जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाईची मोहीम उघडली.

मंगळवेढा : येथील पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाईची मोहीम उघडली. मटका घेणाऱ्या एजंटासह तब्बल 61 जनावर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच जुगार अड्ड्यावर धाड टाकून 7 प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई करून रोख रक्कम ,8 दुचाकी,6 मोबाइल सह 5 लाख 26 हजार 840 रुपयाचा ऐवज हस्तगत केला या कारवाईने मंगळवेढ्यात खळबळ उडाली.

पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कारवाई ठरली असून मटका प्रकरणात मल्लेवाडी येथे मटका बुकीचालक सिध्देश्‍वर सलगर याच्या शेतातील एका खोलीत कल्याण,मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा मंगळवेढा,जत,पंढरपूर,

मोहोळ तालुक्यातील एजंटाला हाताशी धरून चालत असल्याची माहिती पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला.यावेळी त्यांना तेथे मोबाईल,प्रिंटर,संगणक,पेन,कागद व इतर जुगाराचे साहित्य मिळून आले.

solapur crime
Pune Crime : देशभरात विविध एटीएम मधून पैसे चोरणाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी केले पंजाबमधून दोघांना अटक

अधिक चौकशी केली असता बुकीचालक हे मोबाईलवर आपले एजंटाकडून येणारे अंदाजे अंक आकडयावर मुंबई मटका नावाच्या जुगारावर पैशाची पैज लावून घेत असल्याची माहिती स्पष्ट झाली. यावेळी बुकीचालक सलगर याच्या मदतीला सुभाष घोगरे,

महादेव ढेकळे,बिभीषण सलगर,तानाजी मेटकरी,संभाजी ढेकळे,सुरेश हजारे असे घटनास्थळी मिळून आले.त्यांची झडती घेतली असता 15 हजार रुपये इतकी रोख रक्कम मिळून आली.तसेच काही मोटर सायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.

solapur crime
Solapur : 'याचा अर्थ मी काय करणार नाही असं समजू नका'; आरोग्य अधिकाऱ्याला आ.समाधान आवताडेंचा इशारा

मटका कोण चालवतो याबाबत चौकशी केली असता सिध्देश्‍वर सलगर हा मुख्य बुकीचालक असल्याचे सांगण्यात येवून नेमलेले एजंट त्यांच्था गावामधून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून अंदाजे आकडयावर पैशाची पैज लावून त्याच्या चिठ्ठया तयार करून त्यांचे फोटो मोबाईल व्हॅटसअ‍ॅपवर बुकीचालकाकडे टॅबवरील व्हॅटसअ‍ॅपवर पाठवित असल्याचे पोलिस हवालदार सुनिल गायकवाड यांनी दिली.

तर दुसऱ्या घटनेची फिर्याद अतुल खराडे यांनी दिली असून दामाजी नगर येथील हनुमान मंदिरात सिद्धेश्वर दत्तू यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असताना टाकलेल्या धाडीत भारत नागणे वय 51 रा.नागणे गल्ली सिद्धेश्वर दत्तू वय 55, संभाजी जाधव वय 57,सिद्धेश्वर सौंमदळे वय 49 हे तिघे राहणार दत्तू गल्ली,

solapur crime
Solapur News : मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात आकाशात रात्री ड्रोन सदृश्य वस्तू फिरल्याने घबराहट

दामोदर यादव वय 64 रा. जय भवानीनगर, संजय मोरे वय 40 दामाजी नगर, शिवाजी सूर्यवंशी वय 51 रा. तळसंगी यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता रोख रक्कम 21 हजार 840 रुपये मिळून आले त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या आठ मोटरसायकली त्याची किंमत 4 लाख 30 हजार रुपये व ते वापरत असलेले विविध कंपनीचे 5 मोबाईल किंमत 65 हजार रुपये असा मुद्देवाल जप्त करण्यात आला.

प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी आतापर्यंत दारू, वाळू, गुटखा या प्रकरणात अनेक कारवाईची मोहीम तीव्र उघडलेली आहे त्या कारवाईमुळे अनेकांनी धास्ती घेऊन ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे बंद केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे मात्र या मोहिमेत सातत्य ठेवल्यास तालुक्यातील अवैधंदे हद्दपार होण्यास मदत होणार आहे. नव्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे विशेषता महिला वर्गातून स्वागत होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com