

Solapur Police Transfers
सोलापूर : शहर पोलिस दलातील दोन सहायक पोलिस आयुक्त काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. एका सहायक आयुक्तांचा कार्यकाळ संपला असून, आणखी तिघे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमधील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा आणि मुख्यालय येथील पोलिस उपअधीक्षकांचा (डीवायएसपी) कार्यकाळ पुढील तीन ते दहा महिन्यांत संपणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी मेअखेर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदांवर बदली होऊन येण्यासाठी अनेक अधिकारी इच्छुक असून, संबंधित बदल्यांकडे त्यांचे लक्ष लागले आहे.