Solapur Politics : करमाळा बाजार समिती इतिहासात प्रथमच अविरोध

जगताप, पाटील, बागल, शिंदे गट अन्‌ भाजपचे एकमत ; रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण
karmala
karmala sakal

करमाळा - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध होण्यावर आज (मंगळवारी) शिक्कामोर्तब झाले. इतिहासात पहिल्यांदाच करमाळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या बाजार समितीची स्थापना माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी केली असून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सभापती निवडीवेळी बंडखोरी झाल्याने जगताप गटाची २९ वर्षांची सत्ता गेली होती. यावेळी मात्र पुन्हा जगताप गटाकडे बिनविरोध सत्ता देण्याची भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची अकलूज येथे बैठक घेऊन गुरुवारी (ता. २२) समन्वय घडवून आणला. या बैठकीत बाजार समितीची सत्ता बिनविरोध जगताप यांना देण्याचा निर्णय झाला. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट, भाजप व प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६१ अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही निवडणूक मोठ्या चुरशीची होईल, असे चित्र होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या वादाचे पडसाद या निवडणुकीत ठळकपणे दिसतील, असे वाटत होते. निवडणुकीत न संचालक मंडळ

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ : जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, जनार्दन नलवडे, महादेव कामटे, तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगिरे, सागर दोंड. सहकारी संस्था इतर मागासवर्गीय शिवाजी राखुंडे. भटक्या विमुक्त जाती व जमाती नागनाथ लकडे. महिला सर्वसाधारण शैलजा मेहेर, साधना पवार. ग्रामपंचायत सर्वसाधारण नवनाथ झोळ, काशिनाथ काकडे. अनुसूचित जाती जमाती बाळू पवार. आर्थिक दुर्बल घटक कुलदीप पाटील. व्यापारी मतदारसंघ ः परेशकुमार दोशी, मनोजकुमार पितळे. हमाल/तोलार मतदारसंघ वालचंद रोडगे.

karmala
Solapur News : अमर बिराजदार यांनी बांधकाम क्षेत्रात ग्राहक अन् विक्रेत्याचा सांधला पूल

सकाळ’चे वृत्त तंतोतंत खरे

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत सुरवातीपासूनच ‘सकाळ’मध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार, अशा आशयाचे वृत्त छापून आले आहे. याशिवाय ‘बाजार समिती निवडणूक बिनविरोध करून टोकाची कटुता कमी करण्याची संधी’ अशी बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. ‘सकाळ’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून, बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

karmala
Solapur : आ.यशवंत माने आणि राजन पाटील यांचा मोहोळची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट - रमेश बारसकर

पाटील गट व बागल गट एकत्र येतील आणि त्यांना आमदार शिंदे समर्थक सावंत गटाची साथ मिळेल, अशी शक्यता गृहीत धरली होती. त्यादृष्टीने सर्व तयारीदेखील झाली होती. त्यामुळे पाटील- बागल -सावंत विरुद्ध जगताप -शिंदे अशी निवडणूक होईल, असे गृहीत धरून सर्व गट कामाला लागले होते. अशा परिस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जगताप- पाटील -बागल यांना एकत्र आणले.

मागील बाजार समिती सभापती निवडीच्या वेळी पाटील गटाचे माजी सभापती शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत बागल गटात जाऊन सभापतिपद मिळवले होते आणि त्यामुळे जगताप गटाची सत्ता गेली होती. यावेळी मोठा वाद झाला. यातून जयवंतराव जगताप व त्यांच्या दोन मुलांवर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत हे तिन्ही गट एकत्र येतील, अशी कोणतीही शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत या तिघांना एकत्र करण्याचे काम रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.

karmala
Solapur News : शहरात लम्पीबाधित गायी मोकाट

बागल गटाला दोन व पाटील गटाला दोन ग्रामपंचायत मतदारसंघातील जागा देण्यात आल्या. त्यानुसार उर्वरित उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणे, ही करमाळा तालुक्याच्या राजकारणातील खूप मोठी घटना समजली जात आहे. मोहिते पाटील यांच्यासोबतच माजी आमदार जयवंतराव जगताप यांना आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी सहकार्य केले.

आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात एकत्र आहेत. बाजार समिती जगताप गटाकडे राहावी, या भूमिकेतून आमदार संजय शिंदे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भरलेले उमेदवार अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसात शिंदे गटाचे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले होते. शिंदे समर्थक सुनील सावंत यांनी सोमवारी (ता. २५) अर्ज मागे घेतला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाटील गट, बागल गट व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतले. मात्र भाजपचे व प्रहार जनशक्ती संघटनेचे उमेदवारी अर्ज निघणार की राहणार? अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र शेवटच्या दहा मिनिटात भाजप व प्रहार जनशक्ती संघटनेच्या उमेदवारांनी अर्ज अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com