सोलापूर : लोकसंख्या जनजागरण दिंडी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

सोलापूर : लोकसंख्या जनजागरण दिंडी उत्साहात

सोलापूर : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा, संगमेश्वर महाविद्यालय व प्रिसिजन फाउंडेशन, सर्वंकष लैंगिक शिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जनजागरण दिंडीचे उद्‌घाटन रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य यांच्या अध्यक्षतेखाली हिरवा झेंडा दाखवून दिंडीचा प्रारंभ करण्यात आला.

व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफ.पी.ए.आय.) सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार, प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, एफ. पी. ए. आय. सोलापूर शाखेचे कोषाध्यक्ष डॉ. एन. बी. तेली, संगमेश्वर महाविद्यालयाचे एनएसएस विभागप्रमुख अण्णासाहेब साखरे, सचिवा प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, डॉ. दीपक नारायणकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजीव प्रधान, डॉ. येळेगावकर, डॉ. शोभा राजमान्य यांनी दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी एफ.पी.ए.आय., सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार यांनी स्वागत केले. या दिंडीत २५ हायस्कूल, महाविद्यालये व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रा. डॉ. आयेशा रंगरेज यांनी प्रास्ताविक केले. सुगतरत्न गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राजकुमार मोहोरकर यांनी आभार मानले.

Web Title: Solapur Population Janjagaran Dindi High Spirits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..