Solapur : विकासासाठी सत्तेच्या चाव्या पुन्हा खा महाडिक आघाडी कडे द्या,सुशील क्षीरसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : विकासासाठी सत्तेच्या चाव्या पुन्हा खा महाडिक आघाडी कडे द्या,सुशील क्षीरसागर

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा साखर कारखाना विरोधकांच्या 25 वर्षे ताब्यात असताना जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास खा धनंजय महाडिक यांनी पाच वर्षाच्या काळात करून दाखविला आहे. त्यामुळे सभासदांनी कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा खा महाडिक यांच्या भीमा विकास आघाडी कडे द्याव्यात असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी केले.

टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यावेळी क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सुशील क्षीरसागर म्हणाले, कारखान्याला अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न भेडसावत होता तो कारखान्याचे विस्तारीकरण करून खा महाडिक यांनी निकाली काढला. तसेच सभासदांना जादा दर देता यावा यासाठी 25 मेगॅवॅटचा सह वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला.

गत गळीत हंगाम संपल्यानंतर असावनी प्रकल्पाचे काम सुरू होत आहे त्यामुळे सभासदांचा सुवर्णकाळ सुरू आहे. कर्जाच्या बाबतीत बोलताना क्षीरसागर म्हणाले ,मोठे प्रकल्प राबवताना कर्ज काढावेच लागते यात खा महाडिक यांनी गैर काय केले. कर्ज काढणे व फेडणे ही व्यवहारिक प्रक्रिया आहे त्याचा कोणीही बाऊ करू नये.

खा महाडिक हे दूरदृष्टी असणारा नेता आहे. सध्या ते राज्यसभेचे खासदार असल्याने मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी आपण त्यांना साकडे घालणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष नसतो तर विकास हाच एकमेव मुद्दा असतो त्यामुळे साखर कारखान्यासह तालुक्याच्या विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurBjp