

Solapur Municipal Corporation
esakal
सोलापूर: शहरातील मध्यवस्तीमधील प्रभाग १५ मधील प्रमुख प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असल्याचे सांगत प्रभागातील चाळीत राहणाऱ्या १० हजारांहून अधिक जणांना हक्काची घरे देण्याबरोबरच रस्ते, ड्रेनेजलाईन, पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक व उच्चभ्रू वसाहती असलेल्या प्रभाग १५ मधील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे विजयी झालेल्या नगरसेवकांनी सांगितले.