Solapur : बदलत्या जीवनशैलीमुळे ‘प्रि-टर्म’ प्रसुतीत वाढ

स्पर्धात्मक नोकरी-व्यवसायाचा परिणाम; सिझेरियनचे वाढले प्रमाण
solapur
solapursakal

सोलापूर : गर्भावस्था ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे जीवनातील प्राधान्यक्रमदेखील बदलले आहे. सद्य:स्थितीत धावपळीच्या जीवनातील शिक्षण, करिअर, आहार तसेच स्पर्धात्मक नोकरी-व्यवसाय यांचा थेट परिणाम प्रसतीवर होत आहे. यामुळे प्री-मॅच्युअर बेबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीस साधारणपणे २० टक्के बेबी हे ‘प्रि-टर्म’ (वेळेपूर्वी) प्रसुतीचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सद्यस्थितीला शारीरिक कारणे, वेगवेगळे आजार, बदललेली जीवनशैली व आहार, ताण-तणाव, व्यायाम नाही, अपुरी झोप या प्रमुख कारणांमुळे मुदतपूर्व प्रसुतीमुळे प्री-मॅच्युअर बाळ जन्माला येते. पुढे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गरोदरपणात महिलांनी आपला आहार, तणावमुक्त, पुरेशी झोप, व्यायाम या बाबींकडे आवर्जुन लक्ष द्यायला हवे. कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सोलापूरसह उस्मानाबाद व कर्नाटकातून प्रसुतीसाठी येणाऱ्या गर्भवती मातांची संख्या अधिक आहे. अनेक कठीण प्रसंगात महिलांना प्रसुतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणले जाते. दवाखान्यात उशिरा दाखल केल्याने काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये दरवर्षी महिलांची प्रसुती होते. त्यात अलिकडे ‘प्रि-टर्म’ प्रसुतीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे कमी दिवस व कमी वजनाच्या बाळांना पुढे आरोग्यासंबंधीच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

कमी दिवस.. कमी वजन.. धोका अधिक

मुदतपूर्व प्रसुतीदरम्यान मातांना धोका नसतो. बाळ कमी दिवसाचे असल्याने त्याचे वजनही कमी असते. अवयवांची योग्य वाढ होत नसल्याने बाळास श्वास घेण्यास अडथळा होतो. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलर लावावे लागते. अशा परिस्थितीत बाळाची योग्य ती काळजी न घेतल्यास बाळ दगवाण्याची शक्यता असते, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिराणकर यांनी दिली.

कमी दिवस.. कमी वजन.. धोका अधिक

मुदतपूर्व प्रसुतीदरम्यान मातांना धोका नसतो. बाळ कमी दिवसाचे असल्याने त्याचे वजनही कमी असते. अवयवांची योग्य वाढ होत नसल्याने बाळास श्वास घेण्यास अडथळा होतो. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलर लावावे लागते. अशा परिस्थितीत बाळाची योग्य ती काळजी न घेतल्यास बाळ दगवाण्याची शक्यता असते, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिराणकर यांनी दिली.

गर्भसंस्कार महत्त्वाचे

गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते. गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे. अशी माहिती डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार पुस्तकात देण्यात आली आहे.

प्री-मॅच्युअर बाळ जन्माला

येण्याची कारणे

जीवनशैलीतील बदललेले प्राधान्यक्रम

बदललेला आहार व ताण-ताणाव

आईच्या पूर्वीच्या आजारमधून जंतूसंसर्ग

रात्रपाळीच्या ड्युटीमुळे बिघडलेले जीवनचक्र

रक्तदाब, शुगरमुळे बाळाचे वजन कमी होणे

आईमध्ये पोषक आहाराचा अभाव व आहार कमी असणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com