
सोनई : तुरी निघण्यास सुरुवात झाली आणि बाजारात भाव पडण्याची सुरुवात झाली आहे. दीड महिन्यापूर्वी दहा हजार रुपये क्विंटलचा भाव असणारी तूर आता हमीभावापेक्षा कमी दरात घेतली जात आहे. त्यामुळे उत्पादकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.