

Driver's quick thinking saves 14 passengers after Shivshahi bus brake failure near Varvade toll.
Sakal
टेंभुर्णी : सोलापूर - पुणे महामार्गावर वरवडे टोलनाका येथे भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही बसचे अचानक ब्रेक फेल झाले परंतू बसचालकाने प्रसंगावधान दाखवून शिवशाही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या एका खांबाला धडकली नंतर मोकळ्या जागेतील विटांच्या ढिगावर जाऊन थांबली सुदैवाने या अपघातात बसमधील कोणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवार ( ता.4 ) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.