Solapur Child Rabies Death : रेबीजमुळे नऊ वर्षीय समर्थ स्वामीचा मृत्यू; अपघातातील जखम कुत्र्याने चाटल्याने संसर्ग झाल्याचा महापालिकेचा दावा

9-Year-Old Boy Dies Due to Rabies in Solapur : सोलापुरातील नऊ वर्षीय समर्थ स्वामीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
Solapur child dies due to rabies

Solapur child dies due to rabies

esakal

Updated on

सोलापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाच भवानी पेठेतील नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत (9-year-old boy dies due to rabies) असून, निष्पाप बालकाचा जीव गेल्याबद्दल नागरिक संतप्त झाले. मात्र, महापालिका प्रशासनाने समर्थला कुत्रा चावला नव्हता, तर अपघातातील जखम कुत्र्याने चाटल्याने रेबीजची लागण झाल्याचा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com