
सोलापूर : पुणे-सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगात होणार आहे. या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे. रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या सव्वातीन तासात पोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार आहे. जवळपास ८८ एक्स्प्रेस रेल्वेचा वेग आता ११० वरून १३० इतका झाला असल्याची माहिती आहे.