सोलापूर : मृत्यूच्या दाढेतून परतला पंकज

राजकोट-कोईमतूर एक्स्प्रेसखाली जाताना गगनने वाचविले
solapur
solapursakal

सोलापूर : वार सोमवार स्थळ सोलापूर रेल्वे स्थानक. दुपारी १ वाजून ५४ मिनिटे झालेले. फलाट क्रमांक एक. सोलापूर स्थानकावर येत असलेली राजकोट-कोईम्बतूर एक्स्प्रेस. रेल्वे थांबण्यापूर्वीच जनरल डब्यातून खाली उतरत असताना, पाय घसरला आणि तो रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमध्ये फसला. हे थरारक दृश्य कर्तव्यावर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल गगन पाल यांना दिसताच त्यांनी त्वरित त्या प्रवाशाकडे धाव घेतली आणि स्वत:चा जीव धोक्यात घालत प्रवासी पंकज भोसले याला बाहेर खेचले. त्याला प्लॅटफॉर्मवर ओढून त्याचा जीव वाचविला. हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

पंकज भोसले (वय- ४०, रा. ६९०, उत्तर कसबा, सोलापूर) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. भोसले हे पुणे ते सोलापूर असा राजकोट-कोईम्बतर एक्स्प्रेसने सोलापूरला येत होते. धावत्या रेल्वेतून उतरु नका, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु नका तसेच रेल्वे ट्रॅक ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करा अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, असे असले तरी अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. रेल्वेतून उतरण्याच्या नादात धावत्या रेल्वेतून खाली उरतरणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर पाहायला मिळाला.

जर पोलीस कर्मचाऱ्याने वेळेवर हात दिला नसता तर युवकाचा जीव क्षणार्धात गेला असता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, अंगावर काटा आणणारे आहे. मात्र, या नादात येणाऱ्या रेल्वेचा स्पीड न समजल्याने आणि रेल्वे येताना दिसल्यावर स्तब्ध झालेल्या युवकाला आरपीएफ कॉनस्टेबलने गगन पाल यांनी हात दिला आणि त्याला फलाटावर ओढले. त्यामुळे त्याचा जीव बचावला आहे. ‘जीवन रक्षा’ या ऑपरेशन अंतर्गत पंकज भोसले नावाच्या प्रवाशाचे प्राण वाचविले.

हा प्रकार घडत असताना त्या एक्स्प्रेसचा धक्का आपल्यालाही लागू शकतो. याचा विचारही गगन पाल यांनी केला नाही आणि त्या युवकाचे प्राण वाचविले. या प्रकाराचे सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर गगन यांच्या वरिष्ठांनी त्यांचे कौतुक तर केले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही देखील यांचे कौतुक केले.

या अपघाताची माहिती आरपीएफ पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना सोमवारी दुपारी पंकजच्या मोबाईलवरुन फोन दिली. त्यानंतर घाबरलेल्या नातेवाईक स्थानकावर त्वरीत पोहचले. नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.

जीव धोक्यात घालून प्रवाशांनी रेल्वेत चढू नका अथवा उतरु नका. त्यामुळे अशा घटनांमुळे जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गाडी थांबल्यास गाडीत प्रवेश करावा.

सतिश विधाते, इनस्पेक्टर, आरपीएफ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com