Solapur : पेपर अवघड गेल्याने सतरा वर्षीय मुलगी पडली घराबाहेर!

तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे केले कुटुंबीयांकडे सुपूर्द
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : ओरिसा येथील सतरा वर्षीय मुलगी घर सोडून रेल्वेने सुरू निघाली. एलटीटी-चेन्नई मेल एक्स्प्रेसमध्ये फिरत असताना कर्तव्यावर असलेले तिकीट निरीक्षक प्रेम रंजन यांना संशय आला. ओरिसा येथून मुलगी हरवल्याची तक्रार आई-वडिलांनी दाखल केलेली. सतर्क असलेल्या तिकीट निरीक्षकाने ‘त्या’ मुलीकडे विचारणा केली असता, पेपर अवघड गेल्याचे तिने सांगितले. यावेळी तिकीट निरीक्षकाने मुलीच्या आईला फोन केला आणि मुलगी रेल्वेतून प्रवास करीत असल्याचे सांगितले. पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुलगी सापडल्याने वडिलांनी तिला प्रेमाने जवळ घेताच सगळ्यांना अश्रू अनावर झाले.

ओरिसा राज्यातील हरिकृष्ण नगर, ब्रह्मपूर (जि. गंजम, ओरिसा) येथील एका अल्पवयीन मुलीने मंगळवारी ट्यूशनमध्ये पेपर अवघड गेल्याने घरातून दुपारी एकच्या सुमारास थेट रेल्वे स्टेशन गाठले. ट्यूशन संपली तरी मुलगी अद्याप घरी न आल्याने आई-वडील सैरभैर झाले. तिच्या मैत्रिणी व नातेवाइकांकडे विचारपूस केली, मात्र ती मिळून आली नाही. ओरिसा येथून जवळपास तीन-चार रेल्वेगाड्या बदलत ‘त्या’ मुलीने थेट पुणे गाठले. यानंतर पुढील प्रवासासाठी एलटीटी-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बसली. तिकीट निरीक्षक प्रेम रंजन यांनी तिच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता तिच्याकडे तिकीट नसल्याचे तिने सांगितले.

आरपीएफ आणि चाइल्ड लाइनची मदत

त्या मुलीला तिकीट निरीक्षकाने ताब्यात घेत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्याकडे सोपविले. आरपीएफने तत्काळ चाइल्ड लाइनशी संपर्क साधला. त्यानंतर चाइल्ड लाइनने पोलिसांच्या तपासकामात मदत केली. त्यांनी पुन्हा त्या मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क करून आधारकार्ड, हरवले असल्याची तक्रार दिलेली प्रत याची व्हॉट्‌सॲपद्वारे माहिती मागितली. कागदपत्रांची तपासणी व खातरजमा केल्यानंतर त्या मुलीला वडिलांकडे सुपूर्द केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तर काय घडले असते!

मागील काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर गुन्हेगारी वृत्तीच्या, व्यसनी लोकांनी एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली होती. या घटनेनंतर याची पुन्हा आठवण निघाली. हरवलेली ही मुलगी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती लागली असती तर काय झाले असते, या कल्पनेने अनेकांच्या अंगावर काटा आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
Marathi News Esakal
www.esakal.com