
शीलरत्न इंगळे
सोलापूर : जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या रणवीर खाडेने विविध स्पर्धेत सुवर्णपदके पटकाविले. या यशामुळे सोलापूरचे नाव उंचावले आहे. रणवीरने विविध स्पर्धेत सहभाग नोंदवत १४ वर्षातील वयोगटात नऊ सुवर्ण तर दोन कास्यपदकांची कमाई करत यश संपादन केले आहे. सध्या रणवीर हा बी एफ दमाणी प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. हे यश संपादन करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले.