दिलासादायक ! सोलापुरात रुग्णांच्या तुलनेत बरे होणारे वाढले; आज 49 पॉझिटिव्ह तर 75 रुग्णांना डिस्चार्ज 

coronavirus-shutterstock.jpg
coronavirus-shutterstock.jpg
Updated on

सोलापूर : आतापर्यंत शहरातील 37 हजार 359 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट झाली असून त्यामध्ये पाच हजार 339 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी तीन हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तत्पूर्वी, शहरात आज नव्या 49 रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बरे झालेल्या 75 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

गंभीर आजार असलेल्या आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची एकूण एक लाख रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्टे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार 17 ते 27 जुलैपर्यंत दररोज सरासरी एक हजार टेस्ट पार पडल्या. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यात घट झाली असून दररोज पाचशे ते सहाशे व्यक्‍तींच्याच टेस्ट केल्या जात आहेत. बुधवारी (ता. 5) शहरातील 678 व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 49 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. न्यू पाच्छा पेठेतील 49 वर्षीय पुरुषाचा आणि भवानी पेठ परिसरातील हनुमान नगरातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता एकूण मृतांची संख्या 369 झाली असून रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदरात घट झाली आहे. 

'या'ठिकाणी सापडले नवे रुग्ण 
बहुरुपी नगर, आदित्य नगर, कृष्णा पार्क, जानकी नगर (विजयपूर रोड), कुर्बान हुसेन नगर, गौरी नगर (एमआयडीसी), श्रध्दा एम्पायर, उत्तर सदर बझार, सतनाम चौक, सिध्दार्थ चौक (लष्कर), शिंदे चौक (नवी पेठ), रेसिडेन्सी क्‍वार्टर (सिव्हिल), चंडक बागेजवळ, वैष्णवी नगर (सैफूल), शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मिरा नगर, ज्ञानेश्‍वर सोसायटी (जुळे सोलापूर), साखर पेठ, चंद्रकिरण अपार्टमेंट (शांती नगर), वैष्णवी हाईट (बाळे), गरिबी हटाव झोपडपट्टी (विजयपूर नाका), सम्राट चौक, वसंत नगर (दावत चौक), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), रामवाडी, साईनाथ नगर, अशोक चौक, मजरेवाडी, रेवणसिध्देश्‍वर नगर (होटगी रोड), हराळे नगर (कुमठा रोड), विडी घरकूल, राघवेंद्र नगर आणि मुरारजी पेठेत नवे रुग्ण सापडले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com