Solapur: ‘ख्रिश्चन हो, नाहीतर घरात राहू देणार नाही’; पतीकडून मारहाण, सासूकडून शिवीगाळ; विवाहितेची पोलिसांत धाव

Woman Alleges Harassment Over Religious Conversion: सोलापूरमध्ये धर्मांतरासाठी दबाव, मारहाण आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
Solapur

Solapur

esakal

Updated on

सोलापूर: विवाहानंतर पती व सासूने सतत छळ केला. ‘मुलींसह चर्चमध्ये जाऊ आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारू, ’ असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ‘ख्रिश्चन धर्म स्वीकार, नाहीतर घरात राहू देणार नाही, ’ असे म्हणूनही त्यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची फिर्याद वर्षा आनंद मित्रगोत्री (रा. वांगी रोड, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com