
प्रमिला चोरगी
Solapur: शुद्ध पाण्याच्या नावाखाली शहरात मोठ्या संख्येने सुरू जारचे प्लांट सुरू आहेत. मात्र हे सर्व प्लांट अनधिकृत असून सोलापूरकरांना पाजण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धतेची हमी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका अन् अन्न व औषध प्रशासन विभागाने ही आमची जबाबदारी नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे प्लांटधारकांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही.