Solapur : अपघातात पती - पत्नी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SOLAPUR

Solapur : अपघातात पती - पत्नी गंभीर जखमी

मोडनिंब : सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब येथे एसटी बस व दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. कळंब येथील शशिकांत दत्तात्रय शिंदे (वय 36)व त्यांच्या पत्नी आम्रपाली शशिकांत शिंदे (वय 34) हे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते.

मोडनिंब येथील उड्डाणपूल संपल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची सोलापूर मुंबई ही बस मोडनिंब बस स्थानकाच्या दिशेने वळत असताना मागून वेगात आलेल्या दुचाकीने बसला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले आहे.