Solapur Accident
sakal
सोलापूर
Solapur Accident : पंढरपूरहून परतीच्या वाटेवर काळाचा घाला; सोलापूरजवळ अपघातात मुंबईच्या 4 भाविकांचा मृत्यू
Solapur Mangalwedha truck cruiser accident : पंढरपूरहून सोलापूरकडे जात असताना मंगळवेढा–देगावजवळ ट्रक व क्लोजरच्या भीषण अपघातात मुंबईच्या चार भाविकांचा मृत्यू झाला, सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली.
मंगळवेढा : पंढरपूरचे विठ्ठल दर्शन करून रेल्वेने जाण्यासाठी सोलापूरला क्रूजर गाडीतून निघालेल्या मुंबईतील भाविकांचा पालखी मार्गावर देगाव जवळ आज सायकाळी 7.15 दरम्यान झालेल्या ट्रक आणि क्लोजर च्या धडकेत तीन महिलासह एका मुलाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे मुंबईच्या भाविकांचे विठ्ठल दर्शन हे अखेरचे ठरले. या प्रकरणाती प्रत्यक्ष घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भाविक पंढरपूर व अक्कलकोटचे देवदर्शनासाठी आले होते. पंढरपूरला विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन परत सोलापूरहून रेल्वेने जाण्यासाठी जात असताना मंगळवेढा पंढरपूर या महापालखी मार्गावर ट्रक

