Solapur : सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ; मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना

सांगोला नाका हा भाग ना ग्रामपंचायतीत ना नगरपालिकेत समाविष्ट आहे.
solapur
solapursakal

मंगळवेढा - शहरालगत असलेल्या सांगोला नाका परिसरातील जवळपास चार ते पाच हजार नागरिकांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नसल्यामुळे हा भाग शासकीय सुविधांपासून वंचित असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १० ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन गटारीचे दूषित पाणी रोखण्यासाठी या ठिकाणी पाइप आणून टाकल्या, तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नव्याने कान्होपात्रा नगर या ग्रामपंचायतीची अधिसूचना प्रशासनाने प्रसिद्ध केली.

सांगोला नाका हा भाग ना ग्रामपंचायतीत ना नगरपालिकेत समाविष्ट आहे. त्यामुळे या परिसरातील जय भवानी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, शरद कॉलनी, एकवीरा माळ परिसर येथील नागरिकांना पायाभूत सुविधांअभावी नरकयातना भोगाव्या लागत असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले.

तसेच या परिसरामध्ये कान्होपात्रा नगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, या मागणीचा प्रस्ताव विभागीय कार्यालयात धूळखात पडला होता. डॉ. दत्तात्रय माळी व आनंद इंगळे यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी २६ जानेवारी २०२० रोजी पंचायत समितीसमोर उपोषण केले होते.

त्यानंतर २ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येथील नागरिकांच्या प्रश्नांवर बैठक झाली. त्यानंतर आवश्यक त्या सुधारणांसंदर्भात आदेश होऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आमदार आवताडे यांनी विकासनिधी दिला, पण नगरपालिका व ग्रामपंचायतीमध्ये हा परिसर समाविष्ट नसल्यामुळे निधी खर्चास अडचण येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करून प्रशासनाला जागे केले.

solapur
Solapur : मध्यरात्री १२.३० अन्‌ पहाटे चार वाजता पाण्याची वेळ; नियमित पाण्याची प्रतीक्षाच; अद्यापही चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात इथल्या नागरिकांच्या प्रश्नावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. आता ग्रामपंचायत निर्मितीसंदर्भात अधिसूचना काढली. लवकरच स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर आणखीन भरघोस निधी उपलब्ध करून देऊ व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू.

- समाधान आवताडे, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा

solapur
Solapur News : लम्पीला रोखण्यासाठी ‘पीपीई किट’ महूदच्या जितेंद्र बाजारेंचा प्रयोग; पशुधन वाचविण्यासाठी उपयुक्त

मंगळवेढा शहरालगत होणार तिसरी ग्रामपंचायत

४४६ कुटुंबासह १३३७ लोकसंख्या, स्मशानभूमीसाठी १.४७ हे., वनविभाग १५.५७ हे., गायरानसाठी ९.४९ हे., लागवडीस अयोग्य क्षेत्र १९५.४ हे. असा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिद्ध केला असून, आलेल्या हरकतींच्या निर्गतीनंतर ही स्वतंत्र तिसरी ग्रामपंचायत शहरालगत अस्तित्वात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com