सोलापूर : महिला शिक्षिकांची शाळा तालुक्‍यात द्वितीय!

बहुशिक्षकी शाळांच्या गटातून खंडाळी शाळेचे यश
solapur
solapursakal

वेळापूर (सोलापूर) : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांमध्ये माळशिरस तालुक्‍यातून इयत्ता पहिली ते चौथी पाचवी बहुशिक्षकी शाळांच्या प्राथमिक गटातून जिल्हा परिषदेच्या खंडाळी शाळेने द्वितीय क्रमांक पटकाविला. सर्वच्या सर्व चार महिला शिक्षक असलेल्या खंडाळी शाळेचा अंतरबाह्य कायापालट करण्यात मोठे यश संपादन केले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेत बालरक्षक मोहीम प्रभावीपणे वापरली. परिणामी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळेने 91 पटावरून 142 पदापर्यंत मजल मारून जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल 66 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 51 विद्यार्थ्यांची वाढीव पटनोंदणी केली आहे.

सारिका महाजन, छाया पोळ, शीतल बिराजदार, कविता हिंगमिरे यांच्या महिलांच्या एकत्रित टीमने हातात ब्रश घेऊन शाळेच्या रंगविलेल्या भिंती, फुलझाडांनी आणि औषधी वनस्पतीने भरलेली परसबाग, खत निर्मिती तेलाच्या डब्यावर पेंट केलेले संदेश, शाळेची बाह्य शोभा वाढवत आहेत. गृह भेटीद्वारे अध्यापन, ऑनलाइन विविध स्पर्धा, झूम व गुगलमीट द्वारे अध्यापन, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, स्वतःचे युट्युब टीव्ही संगणक प्रोजेक्‍टरचा ऑनलाईन अध्यापनसाठी पुरेपूर वापर करून कोरोना काळात अखंडितपणे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.

solapur
'कोरोना काळात मिळालेली शाब्बासकीची थाप लाख मोलाची'

याकामी खंडाळीचे सरपंच बाबुराव पताळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणजित कदम, खंडाळी ग्रामस्थ, पालक वर्ग यांनीही सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या लोकसहभागातून शैक्षणिक उठावात मदत केली, अशी माहिती मुख्याध्यापिका सारिका महाजन यांनी दिली. शाळेच्या उज्वल यशाबद्दल गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख आनंद कचरे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com