Solapur Accident: सोलापूरमध्ये ट्रकला बस धडकून दोघे ठार, पतीसमोरच पत्नीने सोडला जीव

ST Bus Crashes into Truck on Shelgi Bridge; सोलापूरच्या शेळगी ब्रिजवर एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसचालकासह एका महिलेचा जीव गेला, तर ११ जण जखमी झाले.
Solapur Accident

Solapur Accident

esakal

Updated on

सोलापूर / उमरगा: सोलापूर- हैदराबाद रोडवरील शेळगी ब्रीजवर ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या ट्रकला (एमएच १३, एएक्स ३९४९) मागून एसटी बसची जोरात धडक बसली. शुक्रवारी (ता. ३१) पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात बसचालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, ता. उमरगा) आणि मागील सीटवरील महिला नागूबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर) हे जागीच ठार झाले. या प्रकरणी एसटी वाहकाच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com