

Solapur School Struggle
esakal
सोलापूर : ‘आम्हाला शाळा हवी, पण सुरक्षित रस्ताही हवा!’ अशी आर्त हाक देत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शेंडगे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क लोकशक्ती शुगर कारखाना परिसरातच शाळा भरवून अनोखे आंदोलन केले. कारखान्याची संरक्षक भिंत अन् शेजाऱ्यांच्या वादात २१ पटसंख्या असलेल्या या द्विशिक्षकी शाळेचा रस्ता बंद झाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी व शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. या प्रकरणाने प्रशासकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले आहे.