Solapur: धक्कादायक ! परमीट नसतानाही १८ प्रवाशांच्या बसमध्ये ६० चिमुकली

खासगी स्कूल बसवर आरटीओची कारवाई; जागेवरच ठोठावला ३० हजारांचा दंड
Solapur
SolapurSakal

सोलापूर - तुळजापूर रोडवरून शहराकडे येणाऱ्या खासगी स्कूल बसवर आरटीओने हगलूर पुलाजवळ कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे त्या वाहनाला ना फिटनेस ना शालेय विद्यार्थी वाहतुकीची परवानगी. १८ प्रवाशांची क्षमता असतानाही दाटीवाटीत तब्बल ६० चिमुकली त्यात बसविली होती.

आरटीओच्या पथकाने त्यावर कारवाई करीत जागेवरच ३० हजारांचा दंड ठोठावला आणि वाहन जप्त केले. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी चिमुकल्यांना राजेश कोठे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुखरूप पोहोचवले.

Solapur
Pune News : यंदाच्या भीमथडी जत्रेचे वेळापत्रक जाहिर

‘आरटीओ’च्या पथकांद्वारे शहर-जिल्ह्यातील बेशिस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कारवाईवेळी वाहतूक नियम मोडताना आढळलेल्या बेशिस्तांना दंडासोबतच प्रबोधनही केले जात आहे. पण, महामार्ग पोलिस, शहर-ग्रामीणच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना त्यासंबंधी काहीच देणेघेणे नाही, असे चित्र आहे.

मोबाइलमधील ॲपवर बेशिस्तांचा फोटो काढून त्यांना ऑनलाइन दंड करून सोडून दिले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून महामार्गावरील खड्डे बुजविणे, शॉर्टकटसाठी वाहनचालकांनी तोडलेले महामार्गावरील दुभाजकाची दुरुस्ती व प्रबोधन फलक लावणे.

Solapur
Pune News : पुणे महापालिकेने निर्माल्य कंटेनर, मूर्ती संकलन केंद्रांत केली वाढ

दबलेल्या रस्त्याची व तुटलेल्या लोखंडी जाळीची दुरुस्ती अद्याप हाती घेतलेली नाही. तसेच महामार्ग पोलिसांकडून प्रबोधनापेक्षा अधिक प्रमाणात दंडवसुलीवरच भर दिला जात असल्याची स्थिती आहे. ‘आरटीओ’ने मात्र कारवाईला सुरवात केली आहे.

आता बेशिस्त स्कूल बसवर कारवाई

क्षमतेपेक्षा जास्त आणि विनापरवाना कोणत्याही वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.

चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत. आता ‘आरटीओ’ने सोलापूर जिल्ह्यात विशेषत: शहरातील स्कूल बसवर फोकस केला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

Solapur
Mumbai Local Viral Video : दीदी लोकलमधुन बाहेर पडली मात्र चप्पल आतच सोडून आली...फनी व्हिडिओ व्हायरल

मुलांच्या सुरक्षिततेला द्यावे प्राधान्य

स्वस्तात मुलाला शाळेत ये-जा करता येईल म्हणून अनेक पालक त्या वाहनाला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आहे का, त्याच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र आहे का, प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक होतेय, या बाबी पाहत नाहीत.

पालकांनी अशा बाबींची पडताळणी करावी आणि शाळांनीही नियमांचे उल्लंघन होत नाही, याची खात्री करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होवू शकते.

आरटीओने कारवाई केलेल्या या खासगी मिनी बसमध्ये एकाच्या मांडीवर एक दाटीवाटीत वाहनचालकाच्या शेजारी देखील चिमुकल्यांची गर्दी होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी त्या बसवर कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com