

सोलापूर : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडताच सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारादेखील उंचावला आहे. उन्हाची दाहकता वाढतच असून सोमवारी सोलापूरसह राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान सोमवारी (ता. १४) ४२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.