थोडक्यात:
सोलापूर जिल्ह्यात घोणस आणि इतर विषारी सापांमुळे गेल्या वर्षभरात सर्पदंशाने १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यात शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील लोकांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो.
विषारी सापांची लक्षणं ओळखल्यास त्वरित उपचार शक्य होतात आणि मृत्यू टाळता येतो.
Snakebite Deaths Report: सोलापूर जिल्ह्यात २०२४ मध्ये ३७७ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात झालेली आहे. यापैकी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२४ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या ३७७ घटनांपैकी १३९ घटना जुलै ते ऑगस्ट दरम्यान घडल्या आहेत.