Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

Solapur : रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

करमाळा तालुक्याच्या उत्तर भागाला रिटेवाडी उपसा सिंचन योजना राबवावी- माजी आ. नारायण पाटील

करमाळा :करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी उजनीतील अतिरिक्त पाणी उचलून करमाळा तालुक्याच्या उत्तर भागाला द्यावे यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी माजी आ. नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. माजी आमदार पाटील हे गेली अनेक वर्षांपासून तालुक्याच्या उत्तर भागाला उजनीतुन उचलपाणी मिळावे म्हणून मागणी करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत उजनीतुन उत्तर भागासाठी उचल पाणी मिळाले पाहीजे यासाठी प्रयत्न करत आहेत. ही योजना मार्गी लागल्यास वीट ,रायगांव, मांगी, जातेगांव याभागातील गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. याबाबत उपमुख्यमंञी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

कुकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्याचे हक्काचे 5.5 टी.एम.सी.पाणी देय असताना प्रत्यक्षात 500 एम.सी.एफ.टी. पाणी सुद्धा मिळत नसल्याने पावसाळ्यातील चार महिन्याच्या कालावधीत उजनी धरण ओव्हर फ्लो होते. तेव्हा तालुक्याच्या उत्तर भागातील गावातील मांगी मध्यम प्रकल्प, तलाव, पाझर तलाव भरून घेण्यासाठी उचल पाणी देण्यासाठी, सर्वेक्षणासाठी अभियंत्याची नेमणूक आदेश व्हावेत. तालुक्यातील 38 गावातील 24 हजार 562 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजित असताना थोडेही पाणी आजपर्यंत मिळत नसल्याने ग्रामस्थ व शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे.  

अधिकारी वर्गाकडून वरील भागाचे अस्तरीकरण, पोटचार्‍या, कालव्याची दुरूस्ती आदि कामे अपूर्ण असल्याचे तसेच प्रकल्पाच्या इतर तालुक्यातील वरील भागातील शेतकरी कालव्याची मोडतोड करून पाणी चोरी करीत असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यास कुकडी प्रकल्पाचे पाणी हे 250 किलोमीटर अंतरावरून येत असल्याने कितीही प्रयत्न केले तरीही वर्षभरात देय 5.5 टी.एम.सी. पाण्यापैकी 500 एम.सी.एफ.टी. ही मिळत नाही. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याआभावी गैरसोय होते.

उजनी धरणाची क्षमता 117 टी.एम.सी. असून पावसाळ्यात धरण पूर्ण 100 टक्के भरल्यानंतरही ओव्हर फ्लोचे 100  टी.एम.सी. पाणी भीमा नदीद्वारे खाली सोडण्यात येते. परिणामी खालील भागात पूरस्थिती निर्माण होते. परंतु करमाळा तालुका हा अवर्षण प्रवण भाग असल्याने शेतकऱ्याना त्यांच्या शेतातील पिके जगविण्यासाठी प्रचंड अडचणी येतात. पावसाळ्यात 4 महिन्याच्या कालावधीत उजनी धरणातून तालुक्यातील उत्तरेकडील  38  गावातील छोटे मोठे तलाव, मांगी मध्यम प्रकल्प,पाटबंधारे विभागाचे पाझर तलाव आदी भरून घेतल्यास ग्रामस्थ, शेतकऱ्यांची,जनावरांची  गैरसोय दूर होईल.

तालुक्यातील अवर्षण प्रवण उत्तर भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. या योजनेमुळे मांगी, जातेगाव, कामोणे, खडकी, आळजापुर, पोथरे, वीट, कोर्टी, हुलगेवाडी, कुसकरवाडी, गोरेवाडी, मोरवड, रायगांव, फुंदेवाडी, वंजारवाडी, रोशेवाडी, भोसे, पिंपळवाडी , विहाळ, अंजनडोह, पोंधवडी, झरे आदी भागाला याचा मोठा फायदा होणार आहे.

करमाळा तालुक्याच्या उत्तर भागासाठी उजनीत येणारे अतिरिक्त पाणी उचलून  द्यावे या मागणीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत भेटून निवेदन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ बैठक लावण्याचे आश्वासन देत मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन या विषयी चर्चा करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com