

Farmers of Solapur district stage an indefinite protest outside the Sugar Commissioner’s office in Pune,
Sakal
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करीत , महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते पुणे येथील साखर आयुक्त कार्यालया समोर बेमुदत आंदोलनास बसले आहेत. दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या आंदोलनाचे पडसाद काय उमटतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.